पोशिंदी
पोशिंदी पोशिंद्याची पोशिंदी ती त्याला पाहत आली, सुखात आणि दु:खातही.... त्याच्या नंगारालाही ती मायेची धार नाही जी त्याच्या बोटांमध्ये गवसते... ढेकळ ढेकळ होऊन जाते मग... तड्यांची नक्षी पडते स्वत:च तुटते, दुभंगते अन् गहिवरते, वाट पाहते, ढगांनाही तडा पडतात नक्षत्र उतरतात अलगद म्हातारीच्या केसांसारखी तडा भरून जातात, काठोकाठ... पिवळं सोपान चढता चढता हिरवं हिरवं होऊन जातं सारं.... आणि अचानक तिचं सभान रितंपण वास्तवात खेचून आणतं. तडा कोरड्याठाक... त्यातून हपापलेले साप निघू लागतात बघता बघता त्यांचे फास बनतात अन गिळून टाकतात हिरव्या नक्षत्राला सरकारी फायली झपाझप उघडबंद होतात... फायलींना हि तडे पडतात... गठ्ठा खाली जातो. खोल खोल नवीन स्वप्न अशी एकमेकांवर आदळतात, धूळच धूळ.... डोळ्यात आणि मस्तकात.. अल्याड आग... पल्याड शेकोटी धुरकट आच्छादनं... तडा पायाला, तडा हातावरच्या रेषांना तडा खोपटाला, तडा पुस्तकांना तडा दूरवर काचेच्या कुपीत चित्कारणाऱ्या विद्वत्तेला Nation wants to know , Where the farmer should...