Posts

Showing posts from 2016

पोशिंदी

पोशिंदी पोशिंद्याची पोशिंदी ती त्याला पाहत आली, सुखात आणि दु:खातही.... त्याच्या नंगारालाही ती मायेची धार नाही जी त्याच्या बोटांमध्ये गवसते... ढेकळ ढेकळ होऊन जाते मग...   तड्यांची नक्षी पडते स्वत:च तुटते, दुभंगते अन् गहिवरते, वाट पाहते, ढगांनाही तडा पडतात नक्षत्र उतरतात अलगद म्हातारीच्या केसांसारखी   तडा भरून जातात, काठोकाठ... पिवळं सोपान चढता चढता हिरवं हिरवं होऊन जातं सारं.... आणि अचानक तिचं सभान रितंपण वास्तवात खेचून आणतं. तडा कोरड्याठाक...   त्यातून हपापलेले साप निघू लागतात बघता बघता त्यांचे फास बनतात अन गिळून टाकतात हिरव्या नक्षत्राला सरकारी फायली झपाझप उघडबंद होतात... फायलींना हि तडे पडतात... गठ्ठा खाली जातो. खोल खोल नवीन स्वप्न अशी एकमेकांवर आदळतात, धूळच धूळ.... डोळ्यात आणि मस्तकात.. अल्याड आग... पल्याड शेकोटी धुरकट आच्छादनं... तडा पायाला, तडा हातावरच्या रेषांना तडा खोपटाला, तडा पुस्तकांना   तडा दूरवर काचेच्या कुपीत चित्कारणाऱ्या विद्वत्तेला Nation wants to know , Where the farmer should...

रॉ आणि पाकिस्तान

Image
रॉ आणि पाकिस्तान पाकिस्तानने पकडलेले कुलभूषण जाधव हे रॉचे हेर नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. रवि आमले |  April 3, 2016 3:26 AM पाकिस्तानने पकडलेले कुलभूषण जाधव हे रॉचे हेर नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. ते खरेच मानावे लागेल. भारतीय गुप्तचर दुसऱ्या देशात कृष्णकृत्ये करीत नसल्याचेही परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. पण त्यात तथ्य आहे ? असेल , तर मग आपल्या गुप्तचर यंत्रणा नेमके करतात तरी काय ?.. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येण्याच्या ‘ मुहूर्ता ’ वर पाकिस्तानने कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरण जाहीर करावे , येथूनच या प्रकरणाच्या खरेपणाबाबतच्या संशयाला सुरुवात होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध जरा कुठे सुरळीत होत आहेत , अशी शंका येताच भारतात मोठा दहशतवादी हल्ला होतो. या वेळी पाकिस्तानी लष्कराने जरा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी भारताच्या हेरगिरीचे प्रकरण पुढे आणले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कुलभूषण जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल हे रिसर्च अ‍ॅण्ड अनालिसिस िवग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे हेर आहेत. अलीकडेच पाकने त्या...